आंधळकरांकडे आणखी 44 लाखांची बेहिशेबी मालमत्ता

May 8, 2012 4:30 PM0 commentsViews: 12

08 मे

निवृत्त पोलिस निरक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी ऍन्टी करप्शन विभागाकडून एक मे रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना दहा मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहेत. ऍन्टी करप्शन विभागाकडून आंधळकर यांच्या 13 ठिकाणी छापे टाकूण बेहिशेबी मालमत्तेचा तपास करण्यात आला आहे. सुरूवातीला भाऊसाहेब आंधळकर यांनी 1 कोटी 57 लाखाची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचं समोर आलं होतं. मात्र पोलिसांनी पुढील केलेल्या तपासात आणखी 44 लाख 88 हजार रूपयाची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.

एक नजर टाकूया निवृत्त पोलिस निरक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी गोळा केलेल्या बेहिशेबी मालमतेवर

- सोलापूर जिल्हयातील तूळजापूर तालुक्यातील रामगिरी साखर कारखाना भाऊसाहेब आंधळकर यांनी फक्त 20 लाख रूपयात विकत घेतला. – पुण्यात रत्नस्पर्श इंमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे.- पुण्यातील मावळ मध्ये 30 एकर जमीन आहे आणि मित्रआणि नातेवाईकाच्या नावान 100 एकरच्या वर बेनामी जमीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.- मित्र आणि नातेवाईकाच्या नावावर तिन – चार आलिशान मोटार गाड्या

close