‘प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घ्यावा अन्यथा कारवाई करु’

May 9, 2012 1:46 PM0 commentsViews: 4

09 मे

गेल्या 40 दिवसांपासून प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारवर सरकारने आक्रमक भूमिका घेत थेट कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. प्राध्यापकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे बहिष्कार तीन दिवसांमध्ये मागे घ्या नाहीतर कादेशीर कारवाई करणार असा इशारा शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

10 विद्यापीठातील 30 हजार प्राध्यापकांनी गेल्या 40 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. पेपर तपासणी वेळेवर होत नसल्यामुळे परीक्षांचे निकाल अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढत अखेर आज राज्य सरकारने प्राध्यापकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि बहिष्कार मागे घेण्याचा इशारा दिला आहे. 1991 पासून सेवेत असणार्‍या सर्व प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसेच सहाव्या आयोगानुसार फरकाच्या रकमेबाबत राज्य सरकारने केंद्राशी चर्चा करण्याचं आश्वासनही दिलं आहे. उद्या जळगावमध्ये एमफुक्टोच्या प्राध्यापकांची राज्यस्तरीय बैठक होणार याबैठकीत बहिष्कार मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आहे. हंगामी आणि कंत्राटी प्राध्यापकांना काम देण्यात यावं, एमफुक्टोच्या आंदोलनात सहभागी नसलेल्या प्राध्यापकांकडून पेपर तपासणी करावी असं त्यांनी म्हटलं आहे.

close