मुख्यमंत्री अर्जुन मुंडांच्या हेलिकॉप्टरला अपघात

May 9, 2012 9:26 AM0 commentsViews: 2

09 मे

झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हेलिकॉप्टरला आज रांचीमध्ये अपघात झाला. या अपघातात मुंडा हे जखमी झाले आहेत. पण त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे. रांची इथं लँडिंग करताना हा अपघात झाला. यावेळी मुंडा यांच्या पत्नीसुद्धा सोबत होत्या त्याही जखमी झाल्या आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.सर्व जखमी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

close