‘एअर इंडियाच्या पायलट्सचा संप बेकायदेशीर’

May 9, 2012 4:54 PM0 commentsViews: 11

09 मे

एअर इंडियाच्या पायलट्सला दिल्ली हायकोर्टाने झटका दिला आहे. पायलट्सचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. या निकालानंतर एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने आणखी दहा पायलट्सना बडतर्फ केलं आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत संप स्थगित करावा, असा आदेशही कोर्टानं दिला आहे. इतकंच नाही तर संप सुरूच राहिला तर कामगार कपात करण्याचे संकेतही हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी दिले आहेत. दरम्यान, सरकारनं चर्चेसाठी बोलवावं आणि 99 टक्के मागण्या मान्य केल्या तर कामावर परतायला तयार असल्याचं इंडियन पायलट्स गिल्डचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. या वादाचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतोय. एअर इंडियाची 5 डोमेस्टिक तर 2 आंतरराष्ट्रीय उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहे

close