विधान परिषद निवडणुकीत आघाडीला दिलासा;बंडोबांचा माघार

May 10, 2012 12:16 PM0 commentsViews: 7

10 मे

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे . या दोन्ही पक्षांच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र चव्हाण यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तर आमदार जयंत जाधव यांना इथं राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर परभणीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश पाटील यांनीही माघार घेतली आहे. इथं राष्ट्रवादीतर्फे बाबाजानी दुर्रानी यांना देण्यात आली आहे. लातूरमध्ये दिलीपराव देशमुख यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लातूरमधून राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार सैय्यद सलीम यांनी माघार घेतली आहे.

close