स्लॅब कोसळून 11 कामगार जखमी

November 24, 2008 2:10 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर मुंबईमुंबईतल्या विक्रोळी भागात सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब कोसळून 11 कामगार जखमी झाले आहेत. या जखमी कामगारंना भांडुपच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एका कर्मशियल बिल्डिंगचं काम सुरू असताना छपराचा स्लॅब कोसळल्याने हा अपघात झाला. जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमी कामगारांची परिस्थिती स्थिर आहे.

close