मुख्याध्यापकांनी हडपला शाळेचा निधी

May 9, 2012 5:14 PM0 commentsViews: 5

09 मे

अंबरनाथ मधील जिल्हा परिषदेच्या एका उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांनीच शाळेचा निधी हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथ तालक्यातल्या गोरेगावमधील जि.प.च्या उर्दू शाळेच्या नव्या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी आलेला साडेसहा लाखचा निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी हडप केला आहे. त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांना आलेला पोषण आहाराचा निधीही या मुख्याध्यापकांनी सोडला नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उघड्यावरच बसण्याची वेळ आली आहे. उर्दू माध्यमाच्या या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गांची 107 इतकी पटसंख्या आहे. मोडकळीस आल्याने या शाळेला 6 लाख 70 हजार मंजूर करण्यात आले होते. ही रक्कम मुख्याध्यापक नसीन खान यांनी हडप केल्याचं उघडकीस आलं आहे. या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी आता पालक करू लागले आहेत.

close