दूध उत्पादक संघाचा प्रस्तावित संप मागे

May 10, 2012 12:48 PM0 commentsViews: 29

10 मे

दूध उत्पादक संघाचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघटनेच्या नेत्यांनी बारामतीत पवारांची भेट घेतली. दुधाबाबत येत्या आठ दिवसांमध्ये केंद्र सरकार सर्वंकष धोरण जाहीर करणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सांगितलं. राज्यातल्या सर्व दूध उत्पादक संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास अमुलच्या धर्तीवर एखादा ब्रँड निर्माण करता येईल असं मतही पवारांनी व्यक्त केलं. दूधाला मिळणार्‍या अपुर्‍या हमीभावामुळे येत्या 15 मेपासून दूध खरेदी विक्री बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाने दिला होता.

close