सचिनला देणार सोन्याची बॅट भेट !

May 10, 2012 11:21 AM0 commentsViews: 9

09 मे

सेंच्युरीची सेंच्युरी करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं जगभरातून कौतुक होत असताना पुणेकरही त्यात मागे कसे राहतील. लहानपणापासून क्रिकेटचं वेड असलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याने सचिनला तब्बल 1 किलो सोने आणि 6 किलो चांदी वापरून तयार केलेल्या बॅटची ट्रॉफी भेट देण्याचं ठरवलं आहे. ह्या ट्रॉफीची किंमत किमान 50 लाख रुपये असणार आहे. पुण्यातील अनिल रांका यांनी आपल्या 30 कारागीरांबरोबर तब्बल 13 दिवस परिश्रम करून ही ट्रॉफी तयार केली आहे. आयपीएल संपल्यानंतर पुण्यात एक भव्य नागरी सत्कार घेऊन सचिनला ही ट्रॉफी भेट देण्यात येणार आहे.

close