‘पुण्यात बीआरटी प्रकल्प चार नव्या मार्गांवर कशाला ?’

May 10, 2012 1:38 PM0 commentsViews: 2

10 मे

पुण्यामध्ये बीआरटी (BRT) च्या पहिल्या प्रकल्पाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पण असं असताना आणखी 4 मार्गांवर बीआरटी प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतल्या नगरसेवकांसमोर या नव्या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. पण ज्या रस्त्यांवर बीआरटी प्रकल्प राबवणं शक्य नाही अशा ठिकाणी हा प्रकल्प राबवण्याची गरज काय, असा प्रश्न पुणे जनहित आघाडीच्या उज्ज्वल केसकर यांनी उपस्थित केला आहे. कात्रज – हडपसर मार्गावर सुरू करण्यात आलेला बीआरटी प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. त्यासाठी निधी खर्च झाला. म्हणूनच हे पैसे कुठे खर्च झाले ते लपवण्यासाठी नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इनामदार यांनी केला आहे. या प्रकल्पासाठी जेनेनेयूआरएम (JNNURM) अंतर्गत 1034 कोटी रुपये मंजूर केले गेलेत असं सांगण्यात येतंय. पण ही रक्कम या अगोदरचं खर्च झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहे.

close