प्राध्यापकांचा बहिष्कार सुरूच राहणार

May 10, 2012 1:47 PM0 commentsViews: 4

10 मे

'प्राध्यापकांनी आपला संप तीन दिवसात मागे घ्यावा अन्यथा कारवाई करण्यात येईल' असा सरकारने इशारा देऊन सुध्दा प्राध्यापकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार सुरूच राहणार आहे. सरकारने अल्टिमेटम देऊनही प्राध्यापकांनी माघार घ्यायला नकार दिला आहे. सरकारने काल प्राध्यापकांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. पण त्यावर प्राध्यापकांची एम-फुक्टो ही संघटना समाधानी नाही. प्राध्यापक संघटनेची आज जळगावमध्ये बैठक झाली. त्यात बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यावर सरकार काय भूमिका घेतंय, याकडे लक्ष आहे.

close