क्रिकेट मॅचवर बेटिंग : 7 जणांना अटक

November 24, 2008 3:16 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर, पुणे भारत-इंग्लंड वन डे सिरीजवर सट्टा लावणार्‍या सात जणांच्या टोळीला लोणावळा इथे अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री लोणावळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. हे सातही जण मुंबईत राहणारे असून कांदिवलीला राहणारा केतन चावला या टोळीचा म्होरक्या आहे. लोणावळ्यातल्या गोल्ड व्हॅली भागातल्या बंगल्यात ते सट्टा लावायचे. या टोळीकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, एक टीव्ही, 29 मोबाईल असा जवळपास 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. या सातही जणांना वडगाव न्यायालयात हजर केलं असता त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलं.