डेक्कनला हरवून दिल्ली नंबर 1

May 10, 2012 2:48 PM0 commentsViews: 2

10 मे

डेव्हिड वॉर्नरच्या तुफान सेंच्युरीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने डेक्कन चार्जर्सचा 9 विकेट राखून धुव्वा उडवला. डेक्कनने पहिली बॅटिंग करत 187 रन्स केले. शिखर धवननं सर्वाधिक 87 रन्स केले. पण विजयाचे हे बलाढ्य आव्हान वॉर्नरच्या फटकेबाजीसमोर अगदी सोप बनलं. वॉर्नरनं अवघ्या 54 बॉलमध्ये नॉटआऊट 109 रन्स केले आहे. यात तब्बल 7 सिक्स आणि 10 फोरचा समावेश आहे. यंदाच्या आयपीएलमधली ही तिसरी आणि सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे. या विजयाबरोबरच दिल्लीने पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थान गाठलं आहे.

close