नागपूर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जमावाचा पोलिसांना घेराव

May 10, 2012 10:12 AM0 commentsViews: 1

10 मे

नागपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कळमणा पोलीस स्टेशनला नागरिकांनी घेराव घातला आहे. काल सकाळी तीन जणांची चोर समजून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी निरपराध लोकांना ताब्यात घेतल्याचा आरोप करत कळमणच्या रहिवाश्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. रहिवाश्यांसोबत आमदार कृष्णा खोपडेही घेरावात सहभागी झाले आहे. निरपराध लोकांना सोडून देण्यात यावे अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पोलिसांनी 25 जणांना संशायवरुन ताब्यात घेतले आहे त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे आतापर्यंत या प्रकरणी 175 जणाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close