‘बाबासाहेबांचे व्यंगचित्र पुस्तकातून काढून टाका’

May 11, 2012 9:21 AM0 commentsViews: 10

11 मेभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या मुद्यावरुन लोकसभेत आज मोठा गदारोळ झाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं 1949 मध्ये काढण्यात आलेलं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलं होतं. हे व्यंगचित्र काढून टाकावं आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, हे व्यंगचित्र काढण्याचे आदेश एप्रिलमध्येच देण्यात आल्याचा दावा मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच ते आतापर्यंत का काढण्यात आलं नाही याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

close