अवकाळी पावसामुळे राज्यात 22 जणांचा मृत्यू

May 11, 2012 9:42 AM0 commentsViews: 6

11 मे

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे राज्यभरात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात वीज पडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये तीन तर परभणी आणि जालन्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. परभणीत जिल्ह्यात अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. काही गावात अनेक झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर काही जण जखमीही जालेत. यातल्या 6 जणांची परिस्थिती गंभीर आहे. शेतीचं प्रामुख्यानं आंबा, ऊस, भुईमूग, ज्वारी या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे.

close