एअर इंडियाच्या पायलट्सचा संप सुरुच

May 10, 2012 10:41 AM0 commentsViews: 7

10 मे

एअर इंडियाच्या पायलट्सला संप बेकायदेशीर आहे असं दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतरही हा संप सुरूच आहे. या संपामुळे गेल्या दोन दिवसात 18 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. हा संप सुरूच राहिला तर सरकारला अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, अशी ठाम भूमिका हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली आहे. गेल्या दोन दिवसात 18 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, आज आणखी 9 पायलट्सना बडतर्फ केलंय. त्यामुळे दोन दिवसात बडतर्फ केलेल्या पायलट्सची संध्या 45 झाली. तर एअर इंडिया संपानंतर आता किंगफिशरचे पायलटही संपावर गेलेत. पगार न मिळाल्याने पायलट्स संपावर आहेत. उत्तर भारतातले 50 पायलट्स आजारीपणाच्या रजेवर गेले आहेत.

close