त्या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

May 11, 2012 9:59 AM0 commentsViews: 11

11 मेनागपुरात ज्या तिघांची दगडानं ठेचून जमावानं हत्या केली, त्यांच्यावर काही वेळापूर्वीच बुलडाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातशे लोकवस्ती असलेलं बुलडाणा जिल्हयातल्या मोहिदपूर गावावर शोककळा पसरली आहे. नागपुरात हत्या झालेले तिघेही नाथजोगी जातीचे आहेत. बहुरीप्याचं सोंग घेवून गावोगावी भटकंती करत जोगवा मागण्याचं काम हे लोक करतात. सणासुदीच्या काळात हे लोक गावाबाहेर पडतात. पण यावेळी दुष्काळ इतका भीषण आहे की खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही. त्यामुळे गावातले चौघं नागपूरला भिक्षा मागायला गेले होते. पण त्यांना चोर समजून जमावाने त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. यात तिघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे.याप्रकरणी 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर 153 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

close