भारत मंदीपासून खूप दूर – अर्थमंत्री पी चिदंबरम

November 24, 2008 2:42 PM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर दिल्लीअर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आज यूपीए सरकारच्या काळात झालेल्या देशातल्या आर्थिक सुधारणांचा आणि विकासाचा आढावा घेतला. महागाईचा दर आटोक्यात आला असून सरकारच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारत अजून जागतिक मंदीपासून दूर असल्याचंही ते म्हणाले. ते नवी दिल्लीत इकॉनॉमिक एडिटर्सच्या बैठकीत बोलत होते. जेव्हा जीडीपी दरात सलग सहा महिने नकारात्मक घट दिसते तेव्हा त्याला मंदी आहे असं म्हणू शकतो. पण मी सांगेन की भारत मंदीपासून खूप दूर आहे.आपला विकास दर यावर्षी 7.9% होता. आणि पुढच्या वर्षीही चांगलाच राहील. मी मीडियाला मंदी असा शब्द वापरू नये असं सांगेन. असं ते पुढे म्हणाले.

close