‘अजिंठा’ उद्या रिलीज होणार

May 10, 2012 11:05 AM0 commentsViews: 24

10 मे

नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित 'अजिंठा' सिनेमाचा रिलीज होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अजिंठाला सेन्सॉर बोर्डाकडून यू प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे उद्या अजिंठा सिनेमा रिलीज होणार आहे. पण बंजारा समाजाची याचिका हायकोर्टात अजून प्रलंबित आहे आणि त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. बंजारा समाजाने पारोच्या भुमिकेवर आक्षेप घेतला आहे. पारो ही बंजारा समाजाची असून सिनेमात ती आदिवासी समाजाची दाखवल्याचा आरोप बंजारा समाजाने घेतला आहे. याविरोधातील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आता कोर्ट या याचिकेवर का निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close