सिंचनावर खूप खर्च झाला – मुख्यमंत्री

May 11, 2012 10:45 AM0 commentsViews: 5

11 मे

संपूर्ण राज्य सध्या दुष्काळाच्या आगीत होरपळतोय. यासाठी जबाबदार असणार्‍या सिंचन घोटाळ्याचे सत्य आयबीएन लोकमतनं जनतेसमोर मांडलं. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल आता थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. जलसिंचनावर खूप खर्च झाला आणि जिथे चुका झाल्या तिकडे आत्मपरीक्षण करावं लागेल, अशी कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच राज्यातील जलसिंचन प्रकल्पावर अजून 78 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले पण त्याचबरोबर केंद्रावर किती दिवस अवलंबून राहणार याचा विचार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्रात आज एकूण 7 हजार 366 सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. आणि हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत जवळपास 77 हजार कोटी रुपये. गेल्या दहा वर्षात तर जलसंपदा विभागावर 66 हजार 430 कोटी रुपये खर्च झालेत आणि राज्याची सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्क्यांनी वाढली आहे.

close