पायलट्सवर कारवाईसाठी एअर इंडियाची कोर्टात धाव

May 11, 2012 11:21 AM0 commentsViews: 5

11 मे

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही एअर इंडियाच्या पायलट्सचा संप सुरूच आहे. आज संपाचा 4था दिवस उजाडला आहे. त्यामुळे संपकरी पायलटसवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मॅनेजमेंटनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या पायलट्स गिल्डने आता मॅनेजमेंटशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पण संप मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री अजितसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत अजित सिंग आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत. आज सकाळपासून 12 आंतरराष्ट्रीय प्लाईट्स रद्द झाल्या आहेत. एअर इंडियाने आणखी 10 पायलट्सना कामावरून काढून टाकलंय. त्यामुळे दोन दिवसात बडतर्फ केलेल्या पायलट्सची संख्या 46 झाली आहे.

close