ए. राजांचा कारागृहात मुक्काम वाढला

May 11, 2012 11:48 AM0 commentsViews: 4

11 मे

टू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार ए.राजा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली आहे. पण कोर्टाने निकाल 15 मेपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे ए राजांना 15 मेपर्यंत तरी कोर्टातच रहावे लागणार आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे.

close