भीमसैनिकांचा पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला

May 12, 2012 9:09 AM0 commentsViews: 14

12 मे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्राचा वाद आता चिघळला आहे. बाबासाहेबांच्या व्यंगचित्रामुळे व्यथित झालेल्या भीमसैनिकांनी आजडॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. पळशीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पळशीकर यांचे कार्यालय गाठले. पळशीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर संतप्त तीन कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा स्पष्ट झालं आहे. या संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ही जबाबदारी स्विकारली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी काल (शुक्रवारी) एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागारपदाचे राजीनामे दिले आहे. सरकारचा निर्णय आपल्या मान्य नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं पळशीकर यांनी स्पष्ट केलं होता. याच मुद्यावर आक्षेप घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तीन कार्यकर्त्यांनी पळशीकर यांच्याशी आज चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर दाखल झाले. पळशीकर यांच्याशी 15 मिनीट चर्चा केल्यानंतर संतप्त कार्याकर्त्यांनी पळशीकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र सदैवाने पळशीकर याना कोणतीही इजा झाली नाही. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमका वाद काय ?भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एनसीईआरटी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेने अकरावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात एक व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या व्यंगचित्रात भारतीय राज्यघटनेला गोगलगाय संबोधण्यात आले आहे आणि बाबासाहेब या संविधान रुपी गोगलगायीवर बसले असल्याचं दाखवण्यात आले आहे. तर त्यांच्या पाठीमागे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हातात चाबूक घेऊन उभे असल्याचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या प्रकारामुळे दलित संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

close