रेव्ह पार्टीमधल्या 6 जणांना न्यायालयीन कोठडी

November 24, 2008 1:28 PM0 commentsViews:

24 नोव्हेंबर मुंबईजुहू इथल्या रेव्ह पार्टीत ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्यांपैकी 6 जणांना मुंबई किल्ला कोर्टानं 8 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ऑक्टोबरमध्ये 200 जणांना जुहू इथल्या रेव्ह पार्टी दरम्यान अटक केली होती. वैद्यकीय चाचणी केली असता त्यातील 109 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यातल्या काहींना आज मुंबई पोलीसांनी किल्ला कोर्टात सादर केलं. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या 6 जणांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे.

close