दुष्काळाच्या मुद्यावर मंत्रालयात राडा

May 12, 2012 9:59 AM0 commentsViews: 2

12 मे

राज्यातील दुष्काळाच्या झळा आता मंत्रालयापर्यंत पोहचल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या योजना लालफितीत रखडल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जळगावच्या आमदार गिरीश महाजन मंत्रालयात गेले. पण त्यांनाही सरकारी बाबुंच्या कार्यपद्धतीचा फटका बसला. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नावरून आमदार आणि मुख्य सचिव यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेलं. अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. अधिकारी दुष्काळासारख्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

close