पिपरी चिंचवडमधील जखमी हत्तीणीचा मृत्यू

May 11, 2012 12:20 PM0 commentsViews: 12

11 मे

पिंपरी-चिचवड येथील नाल्यात गेल्या पाच दिवसांपासून जखमी अवस्थेत सापडलेल्या हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. प्रसार माध्यमांनी याविषयी बातमी दाखवल्यानंतर वन विभागाने तिला उपचारासाठी जुन्नरला दाखल केलं होतं. जुन्नरमधल्या प्राणी निवारा केंद्रात उपचार सुरू असलेल्या हत्तीणीचा आज मृत्यू झाला. ही हत्तीण गेल्या पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधल्या एका नाल्यात जखमी अवस्थेत पडून होती. या जखमी हत्तीणीच्या पायाला गंभीर जखम झाली होती. हत्तीणीची अवस्थापाहून काही स्थानिक रहिवाशांनी तिची देखभाल केली . अखेर वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन हत्तीणीला उपचारासाठी जुन्नरला हलवले. यावेळी 30 ते 40 कर्मचारी, 1 क्रेन, बुलडोझरच्या मदतीने या हत्तीणीला ट्रकमध्ये बसवण्यात आले. हत्तीणीची अवस्थापाहून यावेळी अनेकांचे डोळे पाणावले. मात्र जुन्नर येथे उपचार घेत असताना जखम मोठी असल्यानं तीनं उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि तिने प्राण सोडला. ज्या हत्तीणीवर इतके दिवस पोट भरले तिला जखमी परिस्थिती सोडून गेलेल्या माहुताबद्दल नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

जखमी हत्तीणीची मृत्यूशी झुंज

close