प्राध्यापकांना सोमवारची ‘डेडलाईन’

May 12, 2012 10:23 AM0 commentsViews: 14

12 मे

आंदोलक प्राध्यापकांनी सोमवारपर्यंत कामावर हजर राहावं नाहीतर त्यांच्यावर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यभरातले 30 हजारहून जास्त प्राध्यापक गेले 42 दिवसांपासून पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्य सरकारशी चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनही या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घ्यावं, त्यासाठी संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत, अशा सुचना टोपे यांनी केल्या आहेत. दरम्यान, प्राध्यापकांच्या बहिष्कारामध्ये फूट पडलीय. एमफुक्टो संघटनेच्या बहिष्काराला इंडियन नेटसेट असोसीएशनने विरोध केला आहे. प्राध्यापकांच्या मागण्या बेकायदेशीर आहेत. प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी नेट-सेट धारकांनी सोमवारपासून हजर राहण्याचं आवाहनही संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय.

close