परभणीत पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

May 12, 2012 10:53 AM0 commentsViews: 9

12 मे

परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीला आला आहे. 7 मे रोजी रात्री 12 च्या सुमाराला प्रथम वर्षात शिकणार्‍या 24 विद्यार्थ्यांचे मध्यरात्री सिनियर्स विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले. या विद्यार्थ्यांना यावेळी मारहाण सुध्दा करण्यात आली. या प्रकरणी प्राचार्यांनी 9 दोषी विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीची दखल घेत प्राचार्यांनी कारवाई केली. या घटनेनंतर महाविद्यालयात शुकशुकाट पसरला असून कोणीही बोलायला तयार नाही.

close