आयपीएलमध्येही ‘दादा’गिरीला ब्रेक ?

May 11, 2012 12:43 PM0 commentsViews: 1

11 मे

पुणे वॉरिअर्सचा कॅप्टन सौरव गांगुलीला आयपीएलच्या उर्वरीत मॅचमध्ये विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्याचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळेच टीम व्यवस्थापन नवी समीकरणं जुळवण्याच्या प्रयत्नात आहे. याचाच एक भाग म्हणून गांगुली आज टीम बाहेर ठेवण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगीतलं आहे. या सीझनमध्ये पुण्याच्या आत्तापर्यंत 13 मॅच झाल्यात त्यापैकी 9 मॅचमध्ये त्याला पराभव पत्कारावा लागाला आहे. त्यातील सलग पाच पराभव तर होम ग्राऊंडवर स्वीकारावे लागले आहे. आता टीमच्या 3 मॅच बाकी आहेत. गांगुलीच्या अनुपस्थितीत स्टिव्हन स्मिथवर कॅप्टन्सीची जबाबदारी दिली जाईल. तर पुण्याची शेवटची मॅच ही कोलकाता नाईट रायडर्सबरोबर रंगणार आहे. त्या मॅचमध्ये गांगुलीला संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. गांगुलीबरोबरचं आशिष नेहरालाही विश्रांती मिलण्याची शक्यता आहे.

close