सिंचन योजनांमधील सत्य बाहेर आलंच पाहिजे – मुख्यमंत्री

May 12, 2012 12:12 PM0 commentsViews: 1

12 मे

सिंचनप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राज्यातल्या सिंचन प्रकल्पांबाबतचं सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे असा हल्लाबोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. त्याचबरोबर सिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याच्या सुचनेमागे कोणताही राजकीय हेतू नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसेच सिंचन योजना अपूर्ण आहेत ही चिंतेची बाब आहे. पण त्या पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे मदत मागणे गैर नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. 20 हजार कोटींपेक्षा जास्त सिंचनावर खर्च करुन सुध्दा 0.1 टक्केच वाढ झाली आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी या अगोदर केली होती तसेच श्वेतपत्रिका काढल्याची सुचना त्यांनी केली होती. आताही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं ठणकावून सांगितले आहे.

close