चिथावणी देणार्‍यांची समजूत काढली पाहिजे – पळशीकर

May 12, 2012 1:22 PM0 commentsViews: 15

12 मे

माझ्यावर झालेला हा हल्ला किरकोळ होता त्यांनी थोडीफार कार्यालयाची तोडफोड केली पण यात त्या मुलांची काहीही चूक नाही कारणकी त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हते अशा प्रकरणात या मुलांचा बळी जातो यामुलांपेक्षा त्यांना चिथावणी देणार्‍यांची समजूत काढली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुहास पळशीकर यांनी दिली. तसेच आमच्या पुस्तकावर केंद्राने तर निर्णय घेतला आहे. त्यामुळे निषेध करायचा असेल तर त्यापलीकडे जाऊन कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. पण पुणे विद्यापीठाच्या कार्यालयाची तोडफोड करुन यातून काय साधले आहे ? याप्रकरणातून सार्वजनिक चर्चेची पातळी उचवण्याचा प्रयत्न झाला तर ते चांगलं असेल असं पळशीकर यांनी स्पष्ट केलं.

close