‘अजिंठा’चे पोस्टर जाळून निषेध

May 11, 2012 2:15 PM0 commentsViews: 2

11 मे

'अजिंठा' सिनेमाचा वादात कोर्टात सुरु असताना आता हा वाद रस्त्यावर उतरला आहे. औरंगाबादमध्ये 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध करण्यात आला. चित्रपटात बंजारा समाजाची संस्कृती ही चुकीची दाखवल्याचा आरोप बंजारा समाजाने केला आहे. याविरोधात चित्रपटाचे निर्माते नितीन देसाई यांचा पुतळा आणि अजिंठा चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध केला. औरंगाबाद हायकोर्टात अजिंठा चित्रपटाबद्दलची पुढची सुनावणी आता 13 जूनला होणार आहे. दरम्यान आज राज्यभर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

close