बचत गटाच्या अभ्यासासाठी विदेशी प्रतिनिधी भारतात

November 24, 2008 2:45 PM0 commentsViews: 90

24 नोव्हेंबर दौंडमनोहर बोडकेभारतातले महिला बचत गट हे आता जागतिक अभ्यासाचा विषय ठरले आहेत. नेपाळ, फिलिपाईन्स आणि लाओस या देशातले आठ प्रतिनिधी सध्या यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले आहेत. दौंड तालुक्यातल्या नानवीज इथं ते बचत गटाचा अभ्यास करत आहेत. या परदेशी पाहुण्याचं आगमन झाल्यावर गावात एकच जल्लोष झाला.महिलांनी मराठमोळ्या पद्धतीनं पाहुण्यांचं ओवाळून स्वागत केलं.पाहुण्याची बैलगाडीतून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली. बचत गट प्रतिनिधी रुपाली जगताप सांगतात, एकंदरीतच मराठमोळं स्वागत आणि बचत गटाचे आर्थिक-सामाजिक आणि विकासात्मक कामकाज पाहून पाहुणे आश्चर्यचकित झाले. यावेळी गावकरी आणि विदेशी पाहुणे यांच्यातल्या संभाषणासाठी द्वैभाषिकांचीही खास सोय करण्यात आली होती.

close