सहकारावरही श्वेतपत्रिका काढायला तयार – हर्षवर्धन पाटील

May 12, 2012 2:28 PM0 commentsViews: 77

12 मे

सिंचन प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घोषणेनंतर आता सहकारावरही श्वेतपत्रिका काढायला आपण तयार आहोत असं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि विरोधी पक्षांनी सहकारातील भ्रष्टाचारावर आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. दरम्यान, सिंचन प्रकल्पातील सगळी परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे असं आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

close