टी-20 मध्ये पाकची टीम सहभागी होणार

May 12, 2012 2:35 PM0 commentsViews: 2

12 मे

यावर्षी होणार्‍या चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानच्या टीमला निमंत्रण देण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी आज चेन्नईत याची अधिकृत घोषणा केली. पाकिस्तानची सियालकोट स्टॅलियन्स ही टीम यावर्षीच्या चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी होणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानची टीम किंवा पाकिस्तानच्या खेळाडूला भारतात खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता तब्बल चार वर्षांननंतर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळणार आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानही लवकरच क्रिकेट सीरिज खेळवली जाईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जातेय.

close