गोंदियात नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा कट उधळला

May 14, 2012 9:05 AM0 commentsViews: 1

14 मे

गोंदियामध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांचा भूसुरूंग पेरुन घातपात करण्याचा कट उधळून लावला. धमदीटोला ते इस्तारी या दोन गावांदरम्यान एका पुलाखाली चार फूट खड्डा करून स्टिलच्या दोन डब्ब्यांमध्ये 20 किलो जिलेटीन, आणि चार डिटोनेटर्स नक्षलवाद्यांनी पुरून ठेवले होते. सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान, पोलिसांना याचा सुगावा लागला, आणि ती सर्व स्फोटकं निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. या कारवाईमुळं मोठा घातपात टळला आहे. दोन महिन्यापूर्वी अशाच्या सुरुंग स्फोटात सीआरआरएफच्या जवानाची गाडी उडवण्यात आली होती. या स्फोटात 16 जण शहीद झाले होते.

close