नेपाळमध्ये विमान अपघातात 13 भारतीयांचा मृत्यू

May 14, 2012 9:19 AM0 commentsViews: 4

14 मे

नेपाळमध्ये आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात 13 भारतीयांसह 15 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. अग्नी या खासगी एअरलाईन्सचे हे विमान होतं. उत्तर नेपाळमध्ये पोखारा शहराजवळ एका डोंगरावरील विमानतळावर लँडिंग करताना या विमानाला अपघात झाला. यातील 4 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. या विमानात एकूण 21 प्रवासी होते. यामध्ये 16 भारतीय, 2 विदेशी प्रवाशी आणि 3 क्रु मेंबर प्रवास करत होते. या अपघातात तीन भारतीय, दोन नेपाळी आणि दोन विदेशी प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या चारही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघात ज्या भारतीय प्रवाशांचा जीव सुदैवाने वाचला त्या दोन्ही लहान मुली आहे. लँडिंग करताना झालेल्या अपघाताचे तुकडे-तुकडे झाले पण याला आग लाग लागली नाही. त्यामुळे काही प्रवाशांचा जीव वाचू शकला.

close