मालेगाव बॉम्बस्फोटात आणखी लष्करी अधिकारी ?

November 24, 2008 5:43 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर, नाशिक निरंजन टकलेमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आता गंभीर वळण घेतंय. आयबीएन लोकमतला उच्चपदस्थ सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव प्रकरणाच्या चौकशीत आणखी किमान पाच लष्करी अधिकारी गुंतले आहेत. हे पाचही अधिकारी सध्या लष्करीसेवेत रुजू आहेत आणि म्हणूनच पोलीस आणि लष्कर या दोन्ही संस्था संयुक्तपणे त्यांची चौकशी करत आहेत. कट्टर हिंदू संघटनांशी संबंध असलेल्या लष्करी अधिकार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे लष्करातील वरिष्ठ अत्यंत चिंतातूर आहेत. याशिवाय केंद्र सरकार बजरंग दल आणि आरएसएसवर बंदी घालण्याविषयी नव्यानंं विचार करत असल्याची माहिती आली आहे. एटीएसनं लष्कराच्या दिल्ली मुख्यालयात 5 अधिकार्‍यांच्या चौकशीची परवानगी मागितली आहे. पाचपैकी तीन जणांचा बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय.

close