गर्भपात महिलेला मारहाण प्रकरणी पोलिसांना आली जाग

May 14, 2012 9:54 AM0 commentsViews: 13

14 मे

सातार्‍यात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्याविरोधात आज सातार्‍यात महिला संघटनांनी मोर्चा काढला. आज महिलांचं एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटलं. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अनेक मागण्या केल्या. सातारा पोलिसांकडून तपास काढून घेऊन दुसर्‍या यंत्रणेकडे देण्याबरोबर सिनिअर इन्स्पेक्टर दयानंद ढोमे यांच्या निलंबनाचीही त्यांनी मागणी केली आहे. गर्भवती महिलेच्या मारहाणीचं हे संपूर्ण प्रकरण गेला एक महिना धुमसतंय.

ही महिला सेक्स वर्कर म्हणून काम करते. गेला एक महिना या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी महिला संघटना करतायत, पण पोलीस मात्र त्यांना दाद देत नव्हते. पण या महिला मोर्चा काढणार आहेत, हे कळताच पोलिसांनी चौकशी सुरु केली. घटना घडून गेल्यावर एक महिन्यानंतर चौकशी सुरु केल्याने पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायेत, असं नागरीकांचं म्हणणं आहे.

दोन एप्रिल रोजी पोलिसांनी सेक्स वर्करला केलेल्या मारहाणीनंतर त्या महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आलीय. अनु असं या महिलेचं नाव आहे. अनु आणि तिची सहकारी अंजना या दोघींनाही सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर दयानंद ढोमे यांनी दोन एप्रिल रोजी बेदम मारहाण केली होती. तेव्हा अनु चार महिन्यांची गरोदर होती. मारहाणीनंतर पाच एप्रिलला रात्री अनुचा गर्भपात झाला.

close