मायावतींच्या ‘ड्रीम पार्क’ची होणार चौकशी

May 14, 2012 5:51 PM0 commentsViews: 2

14 मे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी माजी मुख्यमंत्री मायावतींना धक्का दिला आहे. मायावतींनी उभारलेल्या पार्कमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार विशेष तपास पथकाची स्थापना करणार आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या अहवालानुसार सात लाख रुपयांचे हत्तींचे पुतळे नोयडाला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. लखनौमध्ये विविध पुतळे उभारसाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. दरम्यान, मायावतींचे जवळचे मानले जाणारे मद्य सम्राट पॉन्टी चढ्ढा यांनीही आपल्याकडे बेकायदेशीर संपत्ती असल्याचं मान्य केलंय. गेल्या फेब्रुवारीमध्ये चढ्ढा यांचं घर आणि कार्यालयांवर आयटी विभागाने छापे टाकले होते. त्यात चढ्ढांकडे 175 कोटी बेकायदा संपत्ती असल्याचं आढळलं होतं.

close