येडियुरप्पांचे पुन्हा क’र’नाटक

May 14, 2012 11:16 AM0 commentsViews: 3

14 मे

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी आकांडतांडव सुरु केला आहे. येडियुरप्पा यांच्या बंडाने खळबळ माजली आहे. येडियुरप्पा हे पक्षावर नाराज आहेत. त्यांच्या 9 समर्थक मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर येडियुरप्पा हे आज तुमकूरमध्ये आपल्या समर्थक नेत्यांना भेटणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. काल रविवारी येडियुरप्पांनी सोनिया गांधी यांचं जाहीर कौतुक केलं. काँग्रेसमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली तर सगळेजण एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात पण आपल्याकडे असं काही होतच नाही उलट खुर्ची मिळवण्यासाठी सारखी धडपड करत असतात असा घरचा आहेर येडियुरप्पा यांनी देऊन टाकला होता. येडियुरुप्पांच्या आता नव्या 'नाटका'मुळे भाजप काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close