मुंबईत जकात नाक्यांवर अँटी करप्शनचे छापे

May 15, 2012 9:50 AM0 commentsViews: 2

15 मे

मुंबईतील दहिसर, वाशी, मुलंुड आणि शिवडी या चार जकात नाक्यांवर आज अँटी करप्शन विभागाने छापे टाकले. या नाक्यावंर काही बेकायदेशीर बाबी दिसून आल्या आहेत. गैरव्यवहार करणार्‍या काही दलालांना अँटी करप्शनच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांना पालिकेच्या व्हिजिलन्स विभागाकडे सुपूर्द केलंय. या दलालांची आता महापालिकेकडून चौकशी करण्यात येणार आहे. पण यामध्ये पालिकेच्या काही अधिकार्‍यांचा हात असण्याची शक्यतासुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ऍन्टी करप्शन ब्युरोने अशाचं पध्दतीने छापे टाकून 10 दलालांविरोधात एफआयआर (FIR) नोंदवला होता. त्यामुळे जकातीमधला भ्रष्टाचार समूळ संपवण्यासाठी महापालिका आणि अँन्टी करप्शन ब्युरोने आपले फासे आवळायला सुरुवात केल्याचं दिसतंय.

close