प्राध्यापकांचा पेपर तपासणी केंद्र बंद करण्याचा इशारा

May 15, 2012 9:58 AM0 commentsViews: 1

15 मे

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांची आठमुठेपणाची भूमिका अजूनही कायम आहे. प्राध्यापकांनी आता विद्यापीठातल्या पेपर तपासणी केंद्रच बंद करण्याचा बुक्टू संघटनेनं इशारा दिला आहे. पेपर तपासणी केंद्रात काम बंद ठेवण्याचं आवाहन या प्राध्यापकांनी केलं आहे. सध्या प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे हंगामी कंत्राटी प्राध्यापक आणि – शिक्षण संचालकांच्या मदतीनं पेपर तपासणीचं काम सुरु आहे मात्र एमफुक्टोच्या अध्यक्षांनी आम्ही असं कोणत्याही प्रकारचं आवाहन न केल्याचं म्हटलंय.

close