बेळगाव बंदला हिंसक वळण

May 14, 2012 2:32 PM0 commentsViews: 3

14 मे

बेळगाव भाजपाचे आमदार अभय पाटील यांनी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बसवराज जावळी यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विविध संघांनी पुकारलेल्या बेळगाव बंदला उत्स्फुर्द प्रतिसाद मिळाला. मात्र आज सकाळी या संपाला हिंसक वळण मिळाले. काही कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या 10 बसेसच्या काचा फोडल्यात. आमदार अभय पाटील यांच्या दादागिरीच्या विरोधात निदर्शने देत आमदार अभय पाटील यांना आमदारकीपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या तीन वर्षाच्या काळात आमदार आमदार अभय पाटील यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावणे, पोलीस अधिकार्‍यांशी असभ्य वर्तणूक करणे आणि शासकीय अधिकार्‍यांना मारहाण करणे या आरोपांमुळे बेळगावातील जनतेचा विरोध असल्याच आंदोलकांनी सांगितलं आहे.

close