पळशीकरांच्या घरावर भीमसैनिकांचा मोर्चा

May 15, 2012 10:55 AM0 commentsViews: 5

15 मे

भारतीय राज्य घटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी आज पुण्यात डॉ.सुहास पळशीकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी भीमसैनिकांनी सुहास पळशीकर,योगेंद्र यादव यांचे व्यंगचित्र छळकावून भीमसैनिकांनी निषेध केला. याप्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालच, याप्रकरणी सरकारने सर्व पुस्तकांमधली राजकीय व्यंगचित्रं वगळण्याची आणि पुस्तकं मागे घेण्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहे. मागिल आठवड्यात शनिवारी पळशीकरांच्या कार्यालयावर रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेचा अनेक मान्यवरांनी निषेध व्यक्त केला होता.

close