बाळासाहेब थोरात,अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक

May 14, 2012 2:40 PM0 commentsViews: 97

14 मे

औरंगाबादमध्ये महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. खरिप हंगाम बैठकीत आपल्याला बोलू देत नाहीत असा आरोप करीत त्यांनी सभागृहामध्ये होत असलेल्या बैठकीतून बाहेर पडले. खरिप हंगामाची बैठक सुरु असताना खताचा प्रश्नांविषयर पालकमंत्र्यानी बोल दिले नाही, पालकमंत्री हे जिल्हयातील प्रश्नांवर दुर्लक्ष करतात असा आरोप करीत आपण राजीनामा देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. आज प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे औरंगाबादमध्ये येत असल्यानं त्याची भेट घेऊन आपली नाराजी ते व्यक्त करणार आहेत.

close