आदर्श प्रकरणी तटकरे,निलंगेकरांना समन्स

May 15, 2012 11:28 AM0 commentsViews: 2

15 मे

बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि शिवाजीराव निलंगेकर यांना समन्स बजावण्यात आलाय. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाने हा समन्स बजावला आहे. दोघांनाही 21, 22 मे रोजी साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री असताना तटकरे यांनी बेस्टच्या आगाराचे आरक्षण हटवून ती जागा आदर्शला देण्याचा निर्णय घेतल्याने सोसायटीला जादा एफएसआय मिळाल्याचा तटकरे यांच्यावर आरोप आहेत. तर आदर्श बांधण्यास परवानगी देण्यात आली तेव्हा निलंगेकर पाटील महसूल मंत्री होते. त्यांनी दोन जणांची फ्लॅट मिळण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप आहे.

close