मुंबईचा बंगलोरवर ‘रॉयल’ विजय

May 14, 2012 4:22 PM0 commentsViews: 2

14 मे

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सने बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा रोमांचकारक पराभव केला. पावसाच्या व्यत्ययाने ही मॅच खरं तर उशीराने सुरु झाली पण त्यानंतर या मॅचमध्ये रन्सचा पाऊस पडला. पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने मुंबईसमोर विजयासाठी 172 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण अंबाती रायडू आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने बंगलोरचा 5 विकेटनं दणदणीत पराभव केला. या विजयाबरोबरचं मुंबईनं प्ले ऑफमधलं आपलं स्थान आता पक्क केलं आहे.

प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगलोरची खराब सुरुवात केली. टीम मुख्य फायर ब्रँड ख्रिस गेल 6 रनवर आऊट झाला. तर कॅप्टन विराट कोहलीही फक्त 3 रन्समध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर दिलशान आणि सौरभ तिवारीने बंगलोरची इनिंग सावरली. दिलशानने 47 तर तिवारीने 21 रन्स केले. बंगलोरतर्फे तुफान बॅटिंग करणारा ए बी डिव्हिलिअर्सही आज फक्त 14 रन्स करुन आऊट झाला. पण मयांक अग्रवालने 30 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोर ठोकत 64 रन्स ठोकले आणि बंगलोरला 170 रन्सचा टप्पा पार करुन दिला. पण यानंतर मुंबईच्या इनिंगचीही सुरुवात खराब झाली. मुंबईचे पहिले 3 बॅट्समन फक्त 20 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले होते. हर्शल गिब्ज, सचिन तेंडुलकर आणि रोहीत शर्मा आज अगदी स्वस्तात आऊट झाले. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि कायरन पोलार्डने मुंबईची इनिंग सावरली. रायडूनं 81 तर पोलार्डनं 52 रन्स ठोकले.दोघांनीही तुफान फटकेबाजी करत मुंबईला विजय मिळवून दिला.

close