प्राध्यापकांवर कारवाई करा – राजेश टोपे

May 15, 2012 1:07 PM0 commentsViews: 31

15 मे

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांवर अखेर सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. प्राध्यापकांनी ताबडतोब पेपरतपासणीच्या कामावर यावं असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. पेपर तपासणीला विरोध करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ आणि संस्थाचालकांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर अशा प्राध्यपकांची विद्यापीठाशी आणि त्या संस्थेशी असलेली मान्यता रद्द करा असे आदेशही राजेश टोपे यांनी दिले आहे.

गेल्या 45 दिवसांपासून पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत 10 विद्यापीठ्यांच्या प्राध्यापकांनी हाताची घडी घातली आहे. आज पेपर तपासणी केंद्रात काम बंद ठेवण्याचं आवाहन या प्राध्यापकांनी केलं होतं. बुक्टो संघटनेनं हा इशारा दिला होता. सध्या प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे हंगामी कंत्राटी प्राध्यापक आणि शिक्षण संचालकांच्या मदतीनं पेपर तपासणीचं काम सुरु आहे. एमफुक्टोच्या अध्यक्षांनी मात्र असं कोणत्याही प्रकारचं आवाहन केलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पेपरतपासणीला विरोध करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ आणि संस्थाचालकांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अशा प्राध्यपकांची विद्यापीठाशी आणि त्या संस्थेशी असलेली मान्यता रद्द करा असे आदेशही राजेश टोपे यांनी दिले आहे.

close